| ठेव खात्याचा प्रकार | व्याजदर द .सा. द .शे. |
|---|---|
| ९० दिवस | ९.२५ % |
| ९१ ते १८० दिवस | ९.५० % |
| १८१ ते २७० | ९.७५ % |
| २७१ ते ३६४ | १०.०० % |
| ३६५ | १०.०० % |
सदर ठेव पावती बेचन करून देता येणार नाही.
पावतीची मुदत संपणारी तारीख पावतीवर नमूद केली जाईल व त्याबाबतची पावती धारकास वेगळी सूचना केली जाणार नाही.
एम.आय.एस. ठेव मधील रक्कम मुदत पूर्व मोडल्यास संस्थेच्या नियमानुसार व्याजदर आकारला जाईल.
मुदत ठेवीवरील व्याजाचे दरात व नियमात पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
संस्थेचे भागभांडवल वाढवण्याच्या दृष्टीने व संस्था आर्थिक दृष्ट्या स्वतः चे पायावर उभे करण्याच्या दृष्टीने ठेवी व फंड्स निर्माण केले आहेत.
३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचे वसूल भाग भांडवल रक्कम रु.४,८१,३६,३३०/- इतके होते.मागील वर्ष्याच्या तुलनेत वसूल भाग भांडवलात नेत्रदीपक वाढ झाली असून ३१ मार्च २०२५ अखेर भाग भांडवल रु.५,५१,२६,०२०/- इतके झाले आहे आर्थिक वर्षात रु.६९,८९,६९०/- ने वाढ झालेली आहे.
कायामनिधीवर संस्थेने अहवाल सालात १०% प्रमाणे व्याज दिलेले असून तशी ताळेबंदात तरतूद करण्यात आलेली आहे.